One of the poems I liked. I don't know the name of the poet of this poem, please let me know if you do. I searched all over the web, did not find the name of the poet.
एक मंत्र मनात धर चिलखताची छाती कर,
धुंद निधड्या अश्वासारखं एक वादळ श्वासात भर.
समशेर निस्फृह कर्तव्याची मुठीमध्ये तळपत ठेव,
एक ज्योत दिव्यत्वाची मनामध्ये तेवत ठेव.
असणार उन असणार पाऊस रस्ता कदाचित खडतर असेल,
पाऊल फसेल कधी नशीब रुसेल जग पण कधी तुला हसेल.
भिऊ नको हटू नको ध्येयापासून ढळू नको,
उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको.
अथांग हो नभासारखा धृवासारखा रहा अचल,
मार टाच शुरासारखा जेता होऊन पुढे चल.
पिसे होऊदेत रंगीत सुंदर पंखात विजेचे येउदे बळ,
डोळ्यात तीक्ष्ण भेदक सूर्य काळजात दयेची राहू दे कळ.

No comments:
Post a Comment